'तुला जपणार आहे' मालिकेत रंगणार क्रिकेटचा खेळ
मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)। 'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार आहे. पण त्याआधी मालिकेत ऑफ फील्ड काय घडलंय ते बघू. अथर्व मीराच्या बोलण्याने आपल्यात बदल घडवत आहे. अथर्व साखरपुड्याच्या आधीचे विधी करायला तयार झालाय. साडी श
तुला जपणार आहे


मुंबई, 25 एप्रिल (हिं.स.)।

'तुला जपणार आहे' मालिकेच्या महाएपिसोड मध्ये क्रिकेटचा खेळ रंगणार आहे. पण त्याआधी मालिकेत ऑफ फील्ड काय घडलंय ते बघू. अथर्व मीराच्या बोलण्याने आपल्यात बदल घडवत आहे. अथर्व साखरपुड्याच्या आधीचे विधी करायला तयार झालाय. साडी शोधण्याचा खेळ होतो ज्यात अंबिकामुळे मीरा साडी आणून देते. अथर्व, माया मानाची साडी पुजण्याच्या कार्यक्रमात अंबिका मुद्दाम साडीवर डाग पडावा असं पाहते. पण मीरा तो डाग लागण्यापासून वाचवते. या दरम्यान दादासाहेबांची शिवनाथशी भेट होते. मालिकेत एके ठिकाणी हे सुरु असताना दुसरीकडे मीरा सोबत भांडत असताना वेदाला सुट्टी लागल्याचं अथर्वला कळत.

आपल्या मुलीसोबत वेळ घालवावा म्हणून क्रिकेट मॅचचं आयोजन करतो. क्रिकेटच्या दोन टीम पडतात, पण अथर्वला वाटतंय की वेदाने त्याच्या टीम मध्ये असावं. पण असं होत नाही ती मीराच्या टीम मध्ये जाते आणि गमतीशीर खेळ सुरु होतो. जिथे मीरा वेदा एका टीम मध्ये आहेत. हा सर्व क्रिकेटचा जो घाट आहे तो वेदाच्या आनंदासाठी अथर्वनी रचला आहे.

या सगळ्याबद्दल बोलताना मीराची भूमिका साकारत असलेल्या महिमा म्हात्रेने क्रिकेटचा खेळ खेळण्याचा अनुभव व्यक्त केला “शूटिंग दरम्यान आम्ही क्रिकेटचा सामना शूट करत होतो. उन्हात जरी आम्ही शूट करत असलो तरी पूर्ण टीम सोबत क्रिकेट खेळण्याची मजा ही वेगळीच होती. या सीन मध्ये असं होतं की माया मला धक्का मारते तो सीन शूट करताना जेव्हा माया मला धक्का मारते तो धक्का मला जोरात लागला आणि मी पडले आणि मला थोडंसं लागलं सुद्धा. शूट तर होतच होतं पण आमचा आमचा पण एक क्रिकेटचा खेळ चालला होता. मला खूप मजा आली कारण खूप वर्षानंतर हातात बॅट घेता आली. क्रिकेट खेळता आलं आणि बॉलिंग करता आली. मी बॉल स्पिन करण्याचा प्रयत्न केला तो थोडासा सफल झाला आणि थोडासा गंडला. या सगळ्यात गर्मीपासून वाचण्यासाठी आमचे सेटवरचे जे स्पॉट दादा आहेत ते आमच्यासाठी लिंबू सरबत बनवून आणत होते, ज्यांने आमची एनर्जी वाढत राहावी.”

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande