अहिल्यानगर दि. 26 एप्रिल (हिं.स.) :- नगर तालुक्यात व शहरी भागात मिळून एकाच गटात झालेल्या चुरशीच्या मुख्यमंत्री स्वच्छ शाळा ,सुंदर शाळा स्पर्धेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावि ला.शाळेला यानिमित्ताने प्रथम क्रमांकाचे तीन लाख रुपयां चे बक्षिस नुकतेच प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेत शाळांना विविध निकष पूर्ण करण्या साठी जवळपास 150 गुणांचे मूल्यांकन होते. यामध्ये ठळकपणे शाळेतील अद्ययावत भौतिक सुविधांसह शैक्षणिक गुणवत्ता, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा , स्कॉलर शिप सारख्या स्पर्धा परीक्षेतील यश ,दहावी-बारावी निकाल सोबतच पर्यावरण संवर्धनात पावसाच्या पाण्याचे संवर्धन, कचरा पुनर्वापर,सोलर वापर,परसबाग, ऐतिहासिक वारसा संवर्धन, कला, क्रीडा, सांस्कृतिक योगदान, शालेय परिसरा ची सजावट,विद्यार्थी पालक यांचा कृतिशील सहभाग यासह अनेक बाबींचा समावेश होता.या यशातील कौतुकास्पद बाब म्हणजे यामध्ये नगर शहर महानगर पालिका हद्दीतील सर्व शाळा व सोबतच नगर तालुक्यातील सर्व शाळा मिळून एकच गट होता.
मिळालेल्या या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष अभय फिरोदिया,उपाध्यक्ष अशोक मुथा, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त सुनंदा भालेराव, ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार समितीचे सदस्य भूषण भंडारी, हेमंत मुथा यांनी विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य पोपटराव पवार, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, विष्णू गिरी, कैलास साबळे यांसह सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. या यशामुळे सर्व स्तरातून शाळेचे अभिनंदन होत असून, विद्यार्थी, पालक व अध्यापकांमध्ये आनंद आणि उत्साह संचारला आहे.यापूर्वी देखील मुख्यमंत्री स्वच्छ शाळा...सुंदर शाळा निमित्ता ने बनवलेल्या अत्याधुनिक परसबाग स्पर्धेत देखिल अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागाचे 5 हजार रुपयाचे उत्कृष्ट परसबाग म्हणून प्रथम क्रमांकाचे बक्षिस देखिल विद्यालयास मिळालेले आहे.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni