नाशिक, 26 एप्रिल (हिं.स.)।
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनची सन २०२५ ते २०२८ या कालावधीसाठीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज माघारीनंतर आता प्रचाराला वेग आला आहे. नाशिकमध्ये आगामी काळात फ्लड लाईट स्टेडियम सह उत्तर महाराष्ट्राची झोनल अकॅडमी नाशिक मध्ये करण्याचा मानस अध्यक्ष पदाचे उमेदवार तथा विद्यमान अध्यक्ष धनपाल विनोद शहा यांनी केला.
आयोजित पत्रकार परिषदेत शहा बोलत होते.यावेळी सेक्रेटरी समीर रकटे, चंद्रशेखर दंदने, हेमंत देशपांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. शहा पुढे म्हणाले की , असोसिएशनची तीन मे २०२५ रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाच या वाजे दरम्यान गंगापूर रोड वरील मते नर्सरी जवळ , अन्नपूर्णा हॉल येथे होत आहे. चेअरमनसह कार्यकारीनिच्या दहा अशा एकूण ११ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी खेळाडू पॅनलला प्रतिसाद मिळत आहे. फ्लड लाईट स्टेडियम झाल्यानंतर नाशिकमधून आयपीएल, रणजी, राष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर देखील नाशिकचे खेळाडू चमकतील. झोनल अकॅडमी मध्ये देखील जास्तीत जास्त निधी नाशिकला मिळेल. त्यातून नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात स्टेटलडिम आणि प्रशिक्षण मिळणार आहे. राज्यात सर्वाधिक सभासद नोंदणी नाशिक मध्ये आहेत. ३११२ सभासद आणि ७८ क्लब मेंबर आहेत. आगामी काळात नाशिक मधून जास्तीत जास्त खेळाडू राज्य, राष्ट्र आणि अंतर राष्ट्रीय स्तरावर पुढे येतील. नाशिकमध्ये नुकतीच रणजी स्पर्धा यशस्वी झाली. अशा अशाप्रकारे राज्य , राष्ट्रस्तरावरील स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे शहा यांनी सांगितले. यावेळी सह सेक्रेटरी योगेश हिरे अनिरुद्ध भंडारकर नितीन रात्र राघवेंद्र जोशी बाळासाहेब मंडळी विक्रांत मते, हेतल पटेल, जगन्नाथ पिंपळे ,निखिल टिपरी, शिवाजी उगले, तरुण गुप्ता, सतीश गायकवाड आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI