कॉम्युटर सेंटरमधून 13 लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक
अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.) फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातील डीबीस्कॉडने विवेकानंद कॉलनीतील श्रीकांत कॉम्प्युटर सेंटर दुकानाचे शटर तोडून १३ लॅपटॉप चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांच्या ताब्यातून त
कॉम्युटर सेंटरमधून 13 लॅपटॉप चोरणाऱ्या दोघांना अटक आरोपींमध्ये एका अल्पवयीनचा समावेश  २ लाख ४२ हजाराचे सर्व १३ लॅपटॉप जप्त


अमरावती, 26 एप्रिल (हिं.स.)

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातील डीबीस्कॉडने विवेकानंद कॉलनीतील श्रीकांत कॉम्प्युटर सेंटर दुकानाचे शटर तोडून १३ लॅपटॉप चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक केली. आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. पोलिसांनी दोन्ही चोरट्यांच्या ताब्यातून त्यांनी चोरी केलेले २ लाख ४२ हजाराचे सर्व १३ लॅपटॉप जप्त केले.

शिवकुमार उर्फ शिवा अमोल धोटे (१९) रा. राधेनगर, मोर्शी, जि. अमरावती, एक १६ वर्षीय अल्पवयीन रा. नेरपरसोपंत, जि. यवतमाळ अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत. माहितीनुसार, तक्रारकर्ते संजय जगनराव अढाऊ (६३) रा. आयटिआय कॉलनी यांच्या मालकीचे विवेकानंद कॉलनीत श्रीकांत कॉम्पूटर सेंटर नामक दूकान आहे. अज्ञात चोरट्यांनी २४ एप्रिलच्या मध्यरात्री कॉम्प्युटर सेंटरचे मागील शटर तोडून दुकानातील १३ लॅपटॉप लंपास केले. २४ एप्रिलला संजय अढाऊ यांनी याबाबत फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार पीआय निलेश करे, दुय्यम ठाणेदार पीआय निलेश गावंडे, पीएसआय राहुल महाजन, डीबीस्कॉडचे प्रमुख हेड कॉस्टेबल योगेश श्रीवास, हरीश चौधरी, रोशन वऱ्हाडे, जयेश परिवाले, दिनेश नेमाडे यांनी युध्दपातळीवर गोपनीय व तांत्रिक पध्दतीने तपास सुरू केला.

पोलिसांनी तपासादरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली असता त्यामध्ये एक इसम तोंडाला स्कार्प बांधून आत ठेवलेले एच.पी. डेल, एसार कंपनीचे १३ लॅपटॉप बॅग मध्ये भरतांना दिसला. त्यानुसार पोलिसांनी २४ तासाच्या आत दोन्ही चोरट्यांची ओळख पटवून त्यांना अटक केली. दोन्ही चोरटे अमरावतीत भाड्याच्या खोलीमध्ये राहतात. अटक होताच चोरट्यांनी १३ लॅपटॉप चोरीची कबूली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींनी भाड्याच्या खोलीत लपवून ठेवलेले २ लाख ४२ हजाराचे १३ लॅपटॉप जप्त केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande