मुस्लिम धर्म स्वीकारून धर्मांतर व लग्नासाठी बळजबरी ; अनेकदा बलात्कार, कुटुंबाला संपवण्याची धमकी
युवतीच्या तक्रारीवरून मुस्लिम युवकावर इगतपुरीत गुन्हा दाखल नाशिक, 16 मार्च (हिं.स.)। मुस्लिम युवकाने इगतपुरी येथील युवतीशी गोड गोड बोलून मैत्री केली. बौध्द समाजाचा असल्याचे खोटे सांगुन तिची फसवणुक केली. २३ मार्च २०२२ मध्ये युवती अल्पवयीन असता
मुस्लिम धर्म स्वीकारून धर्मांतर व लग्नासाठी बळजबरी ; अनेकदा बलात्कार, कुटुंबाला संपवण्याची धमकी


युवतीच्या तक्रारीवरून मुस्लिम युवकावर इगतपुरीत गुन्हा दाखल

नाशिक, 16 मार्च (हिं.स.)।

मुस्लिम युवकाने इगतपुरी येथील युवतीशी गोड गोड बोलून मैत्री केली. बौध्द समाजाचा असल्याचे खोटे सांगुन तिची फसवणुक केली. २३ मार्च २०२२ मध्ये युवती अल्पवयीन असतांना तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध करुन बलात्कार केला. कपालेश्वर इगतपुरी येथील मंदिरात २ वेळा बळजबरीने बोलावुन घेतले. आली नाही तर मामाला सांगुन संपुर्ण कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. यासह मुस्लीम धर्म स्विकारुन धर्मांतर करण्यासाठी वेळोवेळी धमकावले. घरात घुसुन २ वेळा तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. या कारणांवरून इगतपुरी येथील १९ वर्षीय पीडित युवतीने इगतपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार इगतपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (d), ३२९ (२), ३५१ (२), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४ व ६ प्रमाणे संशयित आरोपी मुस्तफा शेख ( पुर्ण नाव माहित नाही ) रा. नाशिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande