आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर डॉक्टर व अटकेतील मनीषाच्या मोबईलचे सीडीआर मिळाले
सोलापूर, 26 एप्रिल (हिं.स.)। प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान, डॉ. शिरीष वापरत असलेले दोन आणि अटकेतील मनीषा माने मुसळे यांच्याकडील एक, अशा तीन मोबाईलचे ‘सीडीआर’ पोलिसांना प्र
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर डॉक्टर व अटकेतील मनीषाच्या मोबईलचे सीडीआर मिळाले


सोलापूर, 26 एप्रिल (हिं.स.)।

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अजूनही समोर आलेले नाही. दरम्यान, डॉ. शिरीष वापरत असलेले दोन आणि अटकेतील मनीषा माने मुसळे यांच्याकडील एक, अशा तीन मोबाईलचे ‘सीडीआर’ पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातून घटनेच्या दिवशी आणि अगोदरच्या एक-दोन दिवसांत डॉक्टरांनी नेमके कोणाला कॉल केले, त्यांना कोणाचे कॉल आले याचा उलगडा होणार आहे. त्यानुसार संबंधितांकडे पोलिसा चौकशी करणार आहेत.

पोलिसांनी आता डॉ. शिरीष यांच्या घरातील आणि हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले असून त्याचीही पडताळणी पोलिस करीत आहेत. सुसाईड नोट आणि मनीषा मुसळे माने यांचा माफीनामा हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठविण्यात आला आहे. त्यातून ती सुसाईड नोट डॉ. शिरीष यांनीच लिहिलेली आहे की नाही, याचे उत्तर मिळणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी डॉ. वळसंगकर व मनीषाच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्डिंगचीही पडताळणी होणार असून त्यामधूनही काहीतरी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील, का याचा पोलिस शोध घेत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी रुग्णालयातील डॉ. शिरीष आणि मनीषा यांच्या केबिनची झडती घेऊन काही कागदपत्रे मिळविली आहेत.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande