
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने परभणी तालुक्यातील उमरी परिसरात अवैध गौण खनिज मुरूमाच्या चोरीवर कारवाई करत तब्बल ७० लाख १७ हजार रुपयांचा मद्देमाल जप्त केला आहे.
परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनात अवैध गौण खनिज विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनात परभणी तालुक्यातील उमरी परिसरात गौण खनिज मुरूमाचे अवैध वाहतूक होत असल्याच्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता उमरी - परभणी रस्त्यावरून अवैध मुरूम वाहतुकीचा टिप्पर ताब्यात घेण्यात आला. यावरून पोलीस अंमलदार नामदेव धोत्रे यांच्या फिर्यादीवरून हायवामालक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एमएच ४६ एआर ९५०० ताब्यात घेण्यात आला आहे. तर दुसऱ्या एका कारवाईत उमरी येथील मातोश्री किराणा दुकान परिसरातून हायवा क्रमांक एमएच २४ एयू ८५०० पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis