झेलम नदीला पूर, पाकिस्तानी मीडियाचा भारतावर आरोप
लाहोर , 27 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानातील झेलम नदीला अचानक पूर आल्याने मुजफ्फराबाद जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथील प्रशासनाने वॉटर इमरजन्सीची घोषणा केली आहे.या घटनेमुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,
Jhelam river flood


लाहोर , 27 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानातील झेलम नदीला अचानक पूर आल्याने मुजफ्फराबाद जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येथील प्रशासनाने वॉटर इमरजन्सीची घोषणा केली आहे.या घटनेमुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांनी या संपूर्ण परिस्थितीसाठी भारताला जबाबदार ठरवले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, भारताने पाकिस्तानला न कळवताच झेलम नदीचे पाणी सोडले, यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. या पुरामुळे स्थानिक प्रशासनाने हट्टियन बालामध्ये आणिबाणी लागू करून लोकांना सतर्क रहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मशिदींमधूनही घोषणा करून लोकांना सूचना दिली जात आहे. या घटनेनंतर, नदी काठी राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. या वृत्तानुसार, हे पाणी भारतातील अनंतनाग आणि पाकिस्तानातील चकोठी भागातून वाहत आहे.

तत्पूर्वी, भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेत अनेक निर्णय घेतले आहेत. यातच भारताने सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. यानंतर आता भारत सरकारकडून या पाण्याच्या वापरासंदर्भातही विचार केला जात आहे. दरम्यान, 'मोदी सरकारकडून सिंधू पाणी करारासंदर्भात घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय, हा पूर्णपणे न्यायसंगत आणि देशाच्या हिताचा आहे. पाकिस्तानात सिंधू नदीचे एक थेंब पाणीही जाणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,' असे जल शक्तीमंत्री सीआर पाटिल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टच्या माध्यमाने म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande