
अमेरिकेने अधिकृतपणे घेतली हल्ल्याची जबाबदारी
कोलंबो, 04 मार्च (हिं.स.) । श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ बुधवारी ईराणी नौदलाच्या जहाजावर अमेरिकेच्या पाणबुडीने हल्ला करुन ते नष्ट केले. हल्ल्यात आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक अजूनही बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर अशाप्रकारची ही पहिलीच घटना असून अमेरिकेने अधिकृतपणे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
विशाखापट्टणम येथे आयोजित बहुराष्ट्रीय नौदल सराव मिलान-2026 मध्ये सहभागी झाल्यानंतर ईराणची मौज-क्लास फ्रिगेट प्रकारची ‘इरिस डेना’ ही युद्धनौका मायदेशी (ईराणला) परत निघाली होती. यावेळी अमेरिकेच्या पाणबुडीने या जहाजाला लक्ष्य बनवले. या हल्ल्यानंतर श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते बुद्धिका संपथ यांनी सांगितले की जहाज बुडल्यामुळे 80 जणांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की हल्ल्याच्या वेळी जहाजावर एकूण 180 लोक होते आणि संकटाबाबत सूचना मिळताच श्रीलंकेने नौदलाची जहाजे आणि वायुसेनेची विमाने बचाव मोहीमेसाठी पाठवली. श्रीलंकेच्या आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. अनिल जयसिंघे यांनी सांगितले की 79 जणांना रुग्णालयात नेण्यात आले, त्यातील एका जणाची प्रकृती गंभीर आहे. तर 7 जणांना तातडीची उपचार देण्यात येत आहेत, तर इतरांना हलक्या जखमा झाल्या आहेत.
अमेरिकेकडून हल्ल्याची जबाबदारी
अमेरिकेच्या संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सांगितले की, एक अमेरिकी पाणबुडीने आंतरराष्ट्रीय जलसंधीतील ईरानी युद्ध नौकेवर हल्ला केला. हा दुसरा महायुद्धानंतर शत्रूवरील पहिला असा हल्ला आहे. यापूर्वीच श्रीलंकेच्या नौदलाने हिंद महासागरात जहाज डुंबल्याची माहिती दिली होती. पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आता आणखी गंभीर झाला आहे. अमेरिकेने आणि इस्राएलने तेहरानसह अनेक शहरांवर हवाई हल्ले केले आहेत. गेल्या 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या युद्धात ईराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती वेगाने बिघडली आहे.
परिस्थिती तणावपूर्ण
संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की हिंद महासागरातील अशा सैन्य कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांची सुरक्षा गंभीर संकटात येऊ शकते. श्रीलंका सध्या मानवी बचाव मोहिमेवर लक्ष केंद्रित करत आहे, परंतु ही घटना सूचित करते की युद्ध आता समुद्री मोर्च्यावरही खुलेपणाने दिसून येऊ लागले आहे. मध्य पूर्व आणि हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण राहिली आहे.
आतापर्यंतचा घटनाक्रम
अमेरिका आणि इस्राएलने ईराणमधील सुमारे 2 हजार ठिकाणे लक्ष्य केले आहेत.
हल्ल्यांचा फोकस परमाणु सुविधा, बैलिस्टिक क्षेपणास्त्र लाँचर आणि लष्करी नेतृत्वाच्या ठिकाणी होता.
याला प्रत्युत्तर म्हणून ईराणने हॉर्मुज जलसंधी बंद केली आहे.
ईराणकडून तेहरानने तेल अवीव आणि यरुशलमसह इस्राएलच्या शहरांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले
आखाती देशांमधील अमेरिकी ठिकाणेही हल्ल्यांमध्ये लक्ष्यात आले आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी