सोलापूर, 27 एप्रिल (हिं.स.)
टेंभू योजनेतून सांगोला तालुक्यातील माण नदीला पाणी सोडावे आणि नदीवर असणारे सर्व बंधारे भरून द्यावेत. या मागणीसाठी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. यावर संबंधित विभागाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.
टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांनी टेंभू योजनेनेचे पाणी ५ मे च्या दरम्यान आटपाडी तलावातून माण नदीत सोडण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिके जतन करण्यासाठी आणि दरातील पशुधन जतन करण्यासाठी शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी नुकतीच राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड