बांगलादेशी घुसखोरांना हाकलले नाही, तर महाराष्ट्रातील हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल ! - रणजित सावरकर
* ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन ! मुंबई, २८ एप्रिल (हिं.स.) : पहलगाम येथील आक्रमण हे हिंदू म्हणून केलेले पहिले आक्रमण नाही. यापूर्वी काश्मिरमधून काश्मिरी पंडीतांना हिंदू म्हणूनच निर्वासित करण्यात आले होते. बंगालमधी
पुस्तक प्रकाशन


विक्रम भावे


रणजित सावरकर


* ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या झंझावाती पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन !

मुंबई, २८ एप्रिल (हिं.स.) : पहलगाम येथील आक्रमण हे हिंदू म्हणून केलेले पहिले आक्रमण नाही. यापूर्वी काश्मिरमधून काश्मिरी पंडीतांना हिंदू म्हणूनच निर्वासित करण्यात आले होते. बंगालमधील मुर्शिदाबाद येथे यापूर्वीच हिंदूंच्या क्रूरपणे हत्या करण्यात आल्या. त्यामुळे अशा घटनांचा प्रतिशोध घेतला गेला नाही, हिंदू संघटित होत नाहीत, तोपर्यंत अशी आक्रमणे चालूच रहातील. विक्रम भावे यांनी हिंदूंवरील अत्याचार त्यांच्या पुस्तकातून मांडला आहे. हिंदूंवर दहशतवादाचे आरोप झाले ! जर हिंदू दहशतवादी असते तर विक्रम भावे तुरुंगात गेले नसते ! आतंकवादी जर धर्म म्हणून हिंदूंना गोळ्या घालत असतील, तर धर्मासाठी हिंदू मुसलमानांवर आर्थिक बहिष्कार का टाकू शकत नाहीत ? सध्याच्या स्थितीत आपल्या आजूबाजूला व्यवसाय करणारे बांगलादेशी घुसखोर आहेत. येत्या ५-१० वर्षांत महाराष्ट्रातील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढले नाही, तर सध्याचे सरकार हे शेवटचे हिंदुत्वनिष्ठ सरकार ठरेल ! असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी केले. ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येथील दादर (प.) येथील काशीनाथ धुरू सभागृह येथे रविवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे लेखक श्री. विक्रम भावे यांच्या हस्ते करण्यात आले. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या देशवासियांना कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ तसेच या वेळी कठीण प्रसंगातही हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी धीरोत्तरपणे विक्रम भावे यांच्या पाठीशी उभ्या रहाणार्‍या त्यांच्या धर्मपत्नी सौ. वैदेही भावे आणि मुलगी कु. इंद्रश्री आणि या खटल्यात हिंदुत्वनिष्ठांची बाजू मांडणार्‍या अधिवक्ता सुवर्णा वत्स-आव्हाड यांसह राष्ट्र आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदूविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊया ! - विक्रम भावे

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सीबआय’ने) मला आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अन् अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांना विनाकारण गोवून आमचा तीव्र मानसिक छळ केला. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्याला येनकेनप्रकारेण खोट्या गुन्ह्यात अडकवून यंत्रणा कशा कार्य करतात, याचे प्रत्यक्ष स्वरूप तुम्हाला या पुस्तकातून पाहायला, अनुभवायला मिळेल. या पुस्तकाकडे व्यक्तीगत पाहू नका, तर एका हिंदुत्वनिष्ठाचे प्रातिनिधिक अनुभव म्हणून पहा. ‘या देशात हिंदुत्वनिष्ठ असणे म्हणजे अपराध आहे की काय ?’ असे वाटण्यासारखे हे अनुभव आहेत. हिंदूविरोधी षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊया !

विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या शौर्याचे कहाणी ! - अधिवक्ता संजीव पुनाळेकर

भविष्यात जेव्हा हिंदू आपल्या नातवंडांना कथा सांगतील तेव्हा निश्चितच विक्रम भावे यांची कहाणी सांगतील. विक्रम भावे यांचे पुस्तक म्हणजे हिंदूंच्या शौर्याची कहाणी आहे. विक्रम भावे यांनी लिहिलेले पुस्तक याच शोकांतिकेला वाचा फोडणारे आहे. यापूर्वी विक्रम भावे यांनी ‘मालेगाव स्फोटामागील अदृश्य हात’ हे पुस्तक लिहिले आहे. विक्रम भावे यांनी पुस्तकरूपात व्यक्त केलेली वेदना वैयक्तिक नाही, तर ही ऐतिहासिक कागदपत्रे म्हणून पहायला हवे.

सत्याचा चेहरा नीटपणे दिसण्यासाठी आपण जागे व्हायला हवे ! - अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

विक्रम भावे यांचे यांनी हिंदुत्वासाठी आपल्या जीवनाची अनेकशी वर्षे खर्ची केली. हिंदूंनी आता बिनधास्त बोलायला हवे. कम्युनिस्टानी देशात १४००० हून अधिक हत्या केल्या पण आपण मीडियात केवळ तीन-चार लोकांच्याच हत्या झाल्या हेच दाखवत फिरतात. त्यामुळे सत्याचा चेहरा नीटपणे दिसण्यासाठी आपण जागे व्हायला हवे.

दाभोलकरांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केल्याचे नॅरेटिव्ह निर्माण करण्यासाठी काही लोक कार्यरत होते ! - अभय वर्तक

दाभोलकर यांची हत्या हिंदुत्वनिष्ठांनी केली, असे नॅरेटिव्ह महाराष्ट्रातच नव्हे, तर देश विदेशात जाणीवपूर्वक पसरवण्यात आले. सर्व हिंदूंनी विक्रम भावे यांचे हे पुस्तक वाचावे. ‘हिंदु आतंकवाद’ नावाच्या एका बागुलबुवाच्या बळी पडलेल्या निरपराध तरुणांचे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे. सनातन संस्थेसारख्या एका आध्यात्मिक संस्थेला ‘हिंदु आतंकवादी’ संस्था म्हणून जगभरात कलुषित करण्यासाठी केलेले प्रयत्न होते. ज्या देशामध्ये बहुसंख्यांक हिंदु रहातात, त्या देशात हे घडते, हे अतिशय दुर्दैवी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande