पहलगाममध्ये पर्यटकांचे पुन्हा आगमन सुरु
श्रीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाच दिवसानंतर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून पुन्हा पर्यटक येण्यासही सुरुवात झाली आहे.हल्ल्याच्या दोन दिवसांनंतरच ज्या ठिकाणी हल्ला झाला तो परिसर वगळता पहलगाम पर्यटकांसाठी
Pahlgam tourist


श्रीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाच दिवसानंतर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून पुन्हा पर्यटक येण्यासही सुरुवात झाली आहे.हल्ल्याच्या दोन दिवसांनंतरच ज्या ठिकाणी हल्ला झाला तो परिसर वगळता पहलगाम पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे.

पर्यटनावरच उपजीविका अवलंबून असलेल्या पहलगाममध्ये एरवी दररोज सहा ते सात हजार पर्यटक येत असतात.मात्र पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर ही संख्या शंभर पेक्षाही कमी झाली होती. मात्र रविवारी(दि.२७) पुन्हा एकदा या संख्येत वाढ दिसून आली.

देशातील पर्यटकांबरोबरच परदेशी पर्यटकही येथे आल्याने येथील स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. जे झाले ते दुर्दैवी होते पण त्याने घाबरून चालणार नाही, असे मत महाराष्ट्रातील पर्यटकांच्या समूहाने रविवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

दरम्यान, मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी हा देखील जम्मू काश्मीरमध्ये पोहचले.यावेळी काश्मीर येऊन अतुल कुलकर्णींनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. याशिवाय 'जास्तीत जास्त लोकांनी पहलगाम, काश्मीरला यावं', असं आवाहन त्यांनी केलंय.

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande