सोलापूर : आदिवासी लाभार्थ्यांकरीता कर्ज योजना
सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)। शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा मार्फत एन.एस.टी एफ. डी.सी. नवी दिल्ली तथा राज्यशासन पुरस्कृत कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणारे पुणे ,अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलाप
सोलापूर : आदिवासी लाभार्थ्यांकरीता कर्ज योजना


सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)।

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा मार्फत एन.एस.टी एफ. डी.सी. नवी दिल्ली तथा राज्यशासन पुरस्कृत कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रात येणारे पुणे ,अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर , धाराशिव, बीड, लातुर या जिल्ह्यतील आदिवासी लाभार्थ्यांकरीता कर्ज योजना राबविण्यासाठी खालील तपशिलाप्रमाणे सन 2024-25 साठी योजना निहाय लक्षांक प्रात्प झालेले आहेत.

शाखा कार्यालयाचे नांव- जुन्नर – योजनेचा तपशिल – राज्यशासन पुरस्कृत योजना –स्वयंसहायता बचत गट (रु.5 लक्ष)-04, ऑटो वर्कशॉप/स्पेअर पार्ट (रु.5 लक्ष)- 04 लहान उद्योग व्यवसाय (रू.2 लक्ष) -0 – ऑटो रिक्षा / मालवाहतुक रिक्षा (रू. 3लक्ष) – 04 , वाहन व्यवसाय (रु.10 लक्ष पेक्षा जास्त व 15 लक्ष पर्यंत) 04, - एकुण 16 शाखा कार्यालयाचे नांव- जुन्नर – योजनेचा तपशिल –एन.एस.टी.एफ. डी.सी कर्ज योजना. - स्वयंसहायता बचत गट (रु.5 लक्ष)-10, ऑटो वर्कशॉप/स्पेअर पार्ट (रु.5 लक्ष)- 08 लहान उद्योग व्यवसाय (रू.2 लक्ष) – 17, – ऑटो रिक्षा / मालवाहतुक रिक्षा (रू. 3लक्ष) – 04 , वाहन व्यवसाय (रु.10 लक्ष पेक्षा जास्त व 15 लक्ष पर्यंत) 0, - एकुण 39तरी उपरोक्त जिल्ह्यामधील आदीवासी समाजातील इच्छुक उमेदवारांनी www.mahashabari.in या संकेत स्थळाच्या माध्यमातून 07 एप्रिलपर्यंत ऑनलाईन कर्ज फॉर्म भरण्यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ शाखा कार्यालय ,जुन्नर यांचे कडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारे ऑलाईन अर्ज स्विकारले जाणार नाही. अधिक माहितीसाठी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापक शबरी आदिवासी वित्त व विकास महा. मर्या. शाखा जुन्नर(पुणे) रा. भ. पाटील यांनी केले आहे. ( संपर्क क्र. 02132-295473).

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande