सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)।
महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि.14 ऑगष्ट 2018 अन्वये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील दारिद्रयरेषेखालील भूमीहीन कुटुंबांना 4 एकर जिरायती व 2 एकर बागायती जमिन उपलब्ध करून देण्यात येतेसदर योजनेंतर्गत मौजे पिरटाकळी ता. मोहोळ, जि. सोलापूर खालील तपशीलाप्रमाणे जमीन खरेदी करणेची प्रक्रीया सुरू आहे. खरेदी करावयाच्या जमीनीचे वर्णन खालीलप्रमाणे
जमीन विक्री करणान्या व्यक्तीचे नाव - श्री. सागर उत्तम काकडे जमीन उपलब्ध असलेल्या गावाचे नाव- मौजे सावळेश्वर ता. मोहोळ विक्री करण्यात येणाऱ्या जमीनीचा गट क्रमांक- 292/2/ब/2 एकूण जमीन - 0.81 हे. आर उपरोक्त शेतजमीनीवर कोणाचे खरेदीखत, साठेखत, लीज, कर्ज, दान, बक्षीस, पोटगी, वारसा अगर अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क व अधिकार असल्यास संबंधितांनी सदरचे नोटीस प्रसिध्द झाल्यापासून 07 दिवसांच्या आत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सोलापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, 3 रा मजला दुरध्वनी क्रर्माक 0217-2734950 येथे योग्य त्या कागदपत्रांनिशी लेखी हरकत घ्यावी अन्यथा वरील प्रमाणे मुदतीत कोणाची हरकत, तक्रार न आल्यास खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल व त्यानंतर आलेल्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारीचा फेरविचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.ही जाहीर नोटीस दिली तारीख -28 मार्च 2025अशी माहिती सदस्य सचिव, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना जिल्हास्तरीय समिती तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण सोलापूर सुलोचना सोनवणे यांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड