सोलापूर, 3 एप्रिल (हिं.स.)।
सोलापूर जिल्हयातील युवांनी केलेले समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हयातून एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्था यांना जिल्हास्तर युवा पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानपत्र, रोख पुरस्कार व्यक्तीस प्रत्येकी दहा हजार रुपये संस्थेसाठी गौरवपत्र सन्मानचिन्ह रोख पुरस्कार रुपये पन्नास हजार असे असेल. सदरील पुरस्कारासाठी युवक युवतीस अथवा नोंदणीकृत संस्थांनी ग्रामीण व शहरी भागांत केलेले सामाजिक कार्य राज्याचे शासन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग इ. बाबतचे कार्य शिक्षण प्रौढ शिक्षण रोजगार, आरोग्य, पर्यावरण सांस्कृतिक कला, क्रीडा मनोरंजन, विज्ञान तंत्रज्ञान व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य, नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, इत्यादी बाबत कार्य साहस इत्यादी बाबतचे केलेल्या कार्याचे गुणांकन 01 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षाची केलेली कार्य / कामगिरी विचारात घेण्यात येऊन जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सदर माहिती व अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कुमठा नाका सोलापूर यांचेशी संपर्क साधावा व युवक युवती व नोंदणीकृत संस्थांनी पुरस्कारासाठी परिपूर्ण अर्ज 15 एप्रिलपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केलेले आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड