रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य
रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी ११ महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी १० मार्चपूर्वी आपले ६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल, त्यांना उर
रत्नागिरी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य


रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी ११ महिने करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी १० मार्चपूर्वी आपले ६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल, त्यांना उर्वरित ५ महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव ५ महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक तसेच योजनेचा नव्याने लाभ घेण्यास इच्छुक उमेदवारांची आधार पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय अधिवास प्रमाणपत्र) तपासणी करणे आवश्यक आहे. ही तपासणी येत्या ३० एप्रिलपर्यंत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande