अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती
अमरावती, 4 एप्रिल (हिं.स.)। अमरावती जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. जिल्हा परिषद सेवेतील प्राथमिक शिक्षकांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या पदोन्नत्या आज एकाच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केल्
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती


अमरावती, 4 एप्रिल (हिं.स.)। अमरावती जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे. जिल्हा परिषद सेवेतील प्राथमिक शिक्षकांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या पदोन्नत्या आज एकाच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केल्या.या पदोन्नत्यांसाठी अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ मागील एक वर्षापासून सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावा करत आलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी एक महिन्याआधी अ. महा. प्राथ. शिक्षक संघाला निमंत्रित करून सर्व प्रकारच्या पदोन्नत्या करण्यात येतील, असे आश्वासित केले होते. त्याप्रमाणे विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी दोन ६ पदे, विस्तार अधिकारी वर्ग ३ श्रेणी ३ ची ४ पदे, केंद्रप्रमुख २३ पदे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक मराठी १२० पदे, उर्दू २०, तसेच माध्यमिक शिक्षक उच्च श्रेणी या सर्व पदोन्नत्या आज करण्यात आल्यात. त्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, शिक्षणाधिकारी प्राथमिक अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनवणे, विस्तार अधिकारी श्री मोहने या सर्व पदोन्नतीसाठी राबणारी शिक्षण विभागाची चमू विशेषतः श्री. मालोकर, काळमेघ, ऋषिकेश कोकाटे, बिलबिले, अधीक्षक प्रवीण जिसकार व प्रशासन अधिकारी मुद्रे या सर्वांचे किरण पाटील, गजानन चौधरी, सुभाष सहारे, संजय साखरे, अशोक चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande