अमरावती, 4 एप्रिल (हिं.स.)चिखलदरा तालुक्यातील राहु ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या पिंपल्या गावात मागील एका वर्षापासून बंद पडलेली पाणी पुरवठा योजनेचे अनेक साहित्य बेपत्ता झाल्याने भिषण पाणी टंचाईचा सामना आदिवासींना करावा लागत आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी तक्रार दिलेली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या या पाणी पुरवठा योजनेतील नळ सध्या तहाणलेले असून गावातील हॅण्ड पंपावर पाण्यासाठी महिलांचे भांडण होत आहे. धारणी पासून ८० कि.मी अंतरावरावरील पिपल्या गाव सध्या पाण्याचया भिषण टंचाईसाठी अमरावती जिल्ह्यात ओळखल्या जात आहे. गत वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ग्रामीण भारतासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना साकारण्यात आलेली होती. घराघरात नळ लावण्यात आले. गावगावातील घरासमोर लागलेले नळ फक्त शोभेची वस्तु झालेली आहे. नळांची आता तुटफोट होत आहे. तर दुसरीकडे पाणी पुरवठा योजनेचे स्टार्टर खराब झाल्यावर कोणीतरी ते काढून नेलेले असल्याने आता योजना शंभर टक्के बंद पडलेली आहे. माहितीनुसार, गावात फक्त एकच हॅण्डपंप असल्याने पूर्ण गाव पाण्यासाठी त्या पंपावर जमा होत असल्याने भांडणे सुरू होऊन गावातील शांतता भंग होण्याची भिती व्यक्त होत आहे. विहिरीत भरपुर पाणी असल्यावरही बांधकामाची गुणवत्ता आणिविद्युत उपकरणांचानिकृष्टपणा असल्याने लोकपाणी टंचाईचा सामना करण्यासाठी विवश आहेत. स्थानिक ग्राम पंचायत व सरपंचाने गावातील पाणी टंचाईकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी आहे. मे महिन्यातर पाणी टंचाई तीव्र होऊन नागरिक गाव सोडून जाण्याच्या तयारीत लागतील, असा धोका होऊ शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी