अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक
अहिल्यानगर, 10 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शना खाली उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर विविध राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय कंपन्याशी समन्वय असलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी डीपेक्स
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय टेक्निकल प्रदर्शनात प्रथम क्रमांक


अहिल्यानगर, 10 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शना खाली उच्च गुणवत्ता शिक्षणाबरोबर विविध राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय कंपन्याशी समन्वय असलेल्या अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी डीपेक्स 2025 या टेक्निकल प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती प्राचार्य प्रा.व्ही.बी धुमाळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना प्रा. धुमाळ म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे व कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांच्या मार्ग दर्शनाखाली विविध उपक्रमांबरोबर विविध राष्ट्रीय कंपन्या शी टायप करून विद्यार्थ्यांना थेट नोकरीसाठी संधी उपलब्ध करून दिली जात आहे.याचबरोबर विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला वाव मिळावा याकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.अमृतवाहिनी पॉलिटेक्निक मधील इलेक्ट्रॉनिक अँड टेलिक कम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागातील अपूर्वा आडेप, सानिया भोईर ,उत्कर्ष भामरे या विद्यार्थिनींनी डीपेक्स 2025 या राज्यस्तरीय टेक्निकल प्रकल्प स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना या स्पर्धेमध्ये दहा हजार रुपयांची रोप बक्षीस ट्रॉफी व सन्मान पत्र देण्यात आले आहे.या यशानंतर संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख यांनी या विद्यार्थिनींचा सत्कार केला.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande