अहिल्यानगर : ज्योत्स्ना उद्योग केंद्रात मनोन्याय आणि बालस्नेही संघाची स्थापना
अहिल्यानगर, 10 एप्रिल (हिं.स.)। शहरातील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेत मनोन्याय आणि बालस्नेही संघाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या 2024 च्या निर्देशानुसार करण्यात आली
ज्योत्स्ना उद्योग केंद्रात मनो न्याय आणि बालस्नेही संघाची स्थापना


अहिल्यानगर, 10 एप्रिल (हिं.स.)।

शहरातील मतिमंद विकास शिक्षण मंडळ संचलित ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळेत मनोन्याय आणि बालस्नेही संघाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या 2024 च्या निर्देशानुसार करण्यात आली असून, मनोरुग्ण आणि बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींना न्याय व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या संघाच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना विविध शासकीय सेवा, सुविधा, घरकुल योजना आणि त्यांच्या पुन र्वसनासाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात ॲड. राजाभाऊ शिर्के यांनी दिव्यांगांसाठी अस्तित्वात असलेल्या कायद्यां विषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव होणे आणि त्याचे संरक्षण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजाने या घटकाला समजून घेऊन त्यांच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande