रत्नागिरीत बुधवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद
रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, दि. ९ एप्रिल रोजी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. जिल्ह्यातील उद्योजक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. महा
रत्नागिरीत बुधवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद


रत्नागिरी, 8 एप्रिल, (हिं. स.) : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी, दि. ९ एप्रिल रोजी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे.

जिल्ह्यातील उद्योजक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनासोबत यावेळी सामंज्यस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर यांनी दिली.

या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योगाशी संबंधित सर्व विभाग व त्यांचे प्रतिनिधी (एमआयडीसी, कामगार विभाग, निर्यातीशी संबंधित डीजीएफटी व निर्यातदार वित्त पुरवठाशी निगडीत बँका) उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande