रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे लहान मुलांसाठी छंदवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये मुलं एकत्र येऊन त्यांच्यामध्ये सर्वांगीण विकासासाठी.आणि सुट्टीमध्ये होणारा मोबाइल आणि टीव्हीचा अतिवापर टाळून, त्यांना खेळ, आणि विविध उपक्रम यांची गोडी लावण्यासाठी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवाब्रह्मतर्फे ५ ते ८ वयोगटातील मुलांसाठी ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत छंद वर्ग या उन्हाळी शिबिराचे आयोजन गोखले भवन (नाचणे - साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी) येथे करण्यात आले आहे.
यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कलागुणांना वाव देण्यासाठी योगा, श्लोक, चित्रकला, गाणी, गोष्टी, खेळ, याचबरोबर जादूचे प्रयोग दाखवण्यासाठी तसेच सर्प मित्र आणि इतर तज्ज्ञ मंडळी मुलांना भेटून त्यांचे विशेष मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत.
या छंदवर्ग उन्हाळी शिबिरात नावनोंदणी करण्यासाठी हर्षदा (8605167535) किंवा ओमप्रकाश (9960375796) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी