अमरावती, 9 एप्रिल, (हिं.स.) -भाजपा शहर, ग्रामीण अध्यक्षाची निवडणूक शासकीय विश्रामगृहात प्रचंड गदारोळात झाली. अचानक प्रक्रियेची घोषणा झाली आणि ऐनवेळी जागेचे नियोजन झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे ग्रामीण मंडळ अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृहात भाजपा अंजनगाव शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष निवडणूक आयोजित करण्यात आली. या निवडणुकीसाठी ग्रामीण व शहरातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. तथापि, मंडळ अध्यक्षासाठी ४५ वर्षे वयाची अट घालण्यात आली. अचानक लावलेल्यानिवडणूक प्रक्रिया व जागेचे नियोजन नसल्याने पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गदारोळ केला. या गदारोळातच शहर मंडळ अध्यक्षाची निवडणूक पार पडली, तर ग्रामीण मंडळ अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया तूर्तास रद्द करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी