रत्नागिरी : महिला बचत गटांच्या उपक्रमांना पालक सचिव सीमा व्यास यांची भेट
रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या उपक्रमांना आज पालक सचिव सीमा व्यास यांची भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास आज रत्नागिरीच्या दौ
हाऊसबोट प्रकल्पाला सीमा व्यास यांची भेट


रत्नागिरी, 18 एप्रिल, (हिं. स.) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या उपक्रमांना आज पालक सचिव सीमा व्यास यांची भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव सीमा व्यास आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील एकता महिला प्रभागसंघ (कोतवडे) यांचा हाऊस बोट व पर्यटन बस उपजीविका उपक्रम, उद्योगरत्न महिला प्रभाग संघ (गोळप) यांचे उत्पादन विक्री केंद्र, पावस संघर्ष प्रभाग संघातील झेप उत्पादक गट (मावळंगे) येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. विविध अभियानाच्या कामाला शुभेच्छाही दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.जस्मिन, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी (ग्रामपंचायत) राहुल देसाई तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, प्रभाग संघ पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande