फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रो यांचा बांगलादेशाचे युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस नकार
पॅरिस , 20 मे (हिं.स.)।फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीला नकार दिला आहे.ही बैठक संयुक्त राष्ट्र महासागर संमेलनाच्या काळात होणार होती. युनूस या संमनेलनात सहभागी हो
France president


पॅरिस , 20 मे (हिं.स.)।फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीला नकार दिला आहे.ही बैठक संयुक्त राष्ट्र महासागर संमेलनाच्या काळात होणार होती. युनूस या संमनेलनात सहभागी होण्यासाठी फ्रान्सला जाणार होते. या काळात मॅक्रो यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीसाठी बांगलादेशने विनंती केली होती परंतु फ्रान्स सरकारने हा प्रस्ताव नाकारला आहे.

मॅक्रो यांच्यासोबत बैठक नाकारल्यानंतर युनूस यांनी फ्रान्सचा दौरा रद्द केला आहे. हे जागतिक संमेलन ९ जूनपासून फ्रान्सच्या नीस येथे होणार आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती ८ जूनला संमेलनात सहभागी देशांच्या प्रमुख पाहुण्यांसोबत रात्री जेवण करणार होते. त्याचे निमंत्रण युनूस यांनाही पाठवले होते. फ्रान्सकडून निमंत्रण मिळाल्यानंतर बांगलादेशने मॅक्रो आणि युनूस यांच्यात द्विपक्षीय बैठकीसाठी खूप प्रयत्न केले. यावर फ्रान्सने संमेलनात सहभागी अनेक देशांनी आधीच द्विपक्षीय बैठकीसाठी विनंती केली होती. त्यात आणखी कुणासोबत बैठक घेणे मॅक्रो यांना शक्य नाही असं त्यांनी स्पष्ट केले.

त्याशिवाय द्विपक्षीय बैठकीला नीस संमेलनासोबत जोडायला नको. युनूस यांनी या संमेलनात सहभागी व्हावे असं फ्रान्सने म्हटलं आहे. युनूस त्यांच्या सरकारला समर्थन मिळवण्यासाठी जागतिक नेत्यांना भेटण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते मॅक्रो यांच्या भेटीचा प्रयत्न करत होते जेणेकरून जगाला एक संदेश पाठवता येईल. मात्र आता फ्रान्सच्या या निर्णयाने युनूस यांच्या जागतिक स्तरावर स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.

दरम्यान, फ्रान्सला द्विपक्षीय बैठकीचा इच्छित परिणाम समजून घ्यायचा होता. केवळ एका संदेशासाठी त्याला बैठक नको होती. बांगलादेशने याआधी फ्रान्सकडून नागरिक विमान खरेदी करण्यास रस दाखवला परंतु त्यानंतर पुढे काही प्रगती झाली नाही. बैठकीमागे याचा काही संबंध नाही असं सांगितले जात आहे. युनूस यांनी फ्रान्सचा दौरा रद्द केला असला तरी बांगलादेशचं प्रतिनिधित्व इतर कुणी मंत्री करू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande