नाशिक जिल्ह्यात मे महिन्यात बेमोसमी पाऊस
नाशिक, 31 मे,(हिं.स.)। दोन दिवसापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी यावर्षी मात्र जिल्ह्यामध्ये मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक असा बेमोसमी पाऊस झालेला आहे. या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसाधा
नाशिक जिल्ह्यात मे महिन्यात बेमोसमी पाऊस


नाशिक, 31 मे,(हिं.स.)। दोन दिवसापासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी यावर्षी मात्र जिल्ह्यामध्ये मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक असा बेमोसमी पाऊस झालेला आहे. या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण 7 मे पासून सातत्याने बे मोसमी पाऊस सुरू होता. मागील दोन दिवसापासून या पावसाने विश्रांती घेतली. 27 मे पासून रोहिणी नक्षत्र सुरू झालं असलं तरी देखील रोहिणी नक्षत्राच्या सुरुवातीच्या काळात देखील पाऊस झाला. मात्र, नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने आता इतर कामांना काहीशी सुरुवात झालेली आहे. पण कृषी विभागाने पेरणी व इतर कामांची घाई करू नये, असे आवाहन शेतकऱ्यांना केलेले आहे.

मे महिना म्हणजे हा उष्णतेने अंगाची लाहीलाही करणारा महिना म्हणून सर्वजण हैराण झालेले असतात. पण यावर्षी मात्र मे महिन्यामध्ये बे मोसमी पावसाने उष्णतेपासून काहीशी सुटका केलेली आहे. आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यात मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस झाला असून प्रशासनाने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 187.5 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. यामुळे हा या वर्षीचा नवा रेकॉर्ड नोंदविल्या गेल्याचे सांगितले जात आहे.

या बेमोसमी पावसामुळे नवीन नोंद झाली असली तरी देखील मात्र त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बसला असून शेतकरी हतबल झालेले आहे. सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये ६ हजार ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande