अहिल्यानगरात बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा शुभारंभ
अहिल्यानगर 2 जून (हिं.स.) : भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अंतर्गत नगर तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक न्यू टिळक रोड अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हा शाखा, शहर शाखा व तालुका शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 10 दिवसी
शहरात 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचा शुभारंभ


अहिल्यानगर 2 जून (हिं.स.) : भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर दक्षिण जिल्हा अंतर्गत नगर तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक न्यू टिळक रोड अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हा शाखा, शहर शाखा व तालुका शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामनेर शिबिराचे नगर तालुका अध्यक्ष नितीन शिवाजी साळवे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झाले.

बौद्धाचार्य श्रामणेर शिबिरार्थींना चिवरदान प्रसंगी त्रिशरण पंचशील राष्ट्रीय सचिव भिख्खू महासंघचे भंते ए. सुमेधबोधि, केंद्रीय शिक्षक ए. जी.तायडे गुरुजी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, सरचिटणीस सतीश ओहोळ, कोषाध्यक्ष विजय हूसळे, उपाध्यक्ष भगवंत गायकवाड, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा प्रभारी धोंडीबा राक्षे, राहुल कांबळे, केंद्रीय शिक्षक अण्णा गायकवाड, सचिव गोरख केदारे, सचिव किशोर कांबळे, नगर शहराध्यक्ष बौद्धचार्य दीपक पाटोळे, सरचिटणीस गौतम पाचरणे, कोषाध्यक्ष विजय चाबुकस्वार, उपाध्यक्ष लक्ष्मण माघाडे, अरुण गायकवाड, प्रकाश कांबळे, बाबासाहेब धीवर, विशाल गायकवाड, संजय केदारे, सुनील पंचमुख, संतोष जाधव, सुनील गायकवाड, सावित्रा हाबू, संतोष गायकवाड, मिलिंद आंग्रे, विजीत ठोबे आदीसह जिल्हा व शहर कार्यकारणी उपस्थित होते.या प्रशिक्षणामध्ये पुढील 10 दिवस शिबिर संपन्न होत आहे. सर्व कार्यकारिणी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करणे व बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे उद्दिष्ट सफल करण्याचे कार्य तालुका पदाधिकारी करत असुन अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यात नगर तालुक्याने राबवलेले शिबिर अत्यंत उल्लेखनीय पद्धतीने संपन्न होत आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande