आरपीएफ कॉन्स्टेबलने वाचवला प्रवाशाचा जीव
मुंबई, 31 मे (हिं.स.) : मुंबईच्या लोकमान्य टर्मिनस रेल्वे स्थानकावर शुक्रवारी 30 मे रोजी गाडी पकडण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी खाली कोसळला. सदर प्रवासी रेल्वेखाली येऊन प्राणांतिक अपघाताची शक्यता होती परंतु, घटनेच्या वेळी रेल्वे स्थानकावर तैनात असले
आरपीएफ कॉन्स्टेबलने वाचवला प्रवाशाचा जीव


मुंबई, 31 मे (हिं.स.) : मुंबईच्या लोकमान्य टर्मिनस रेल्वे स्थानकावर शुक्रवारी 30 मे रोजी गाडी पकडण्याच्या प्रयत्नात एक प्रवासी खाली कोसळला. सदर प्रवासी रेल्वेखाली येऊन प्राणांतिक अपघाताची शक्यता होती परंतु, घटनेच्या वेळी रेल्वे स्थानकावर तैनात असलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांनी समयसूचकता दाखवून संबंधित प्रवाशाचे प्राण वाचवले. लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर शुक्रवारी गरीब रथ एक्सप्रेसने गाडी सुरू झाली तेव्हा एक प्रवासी चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होता पण तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील अंतरात घसरला आणि पडला. त्यावेळी प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले मध्य रेल्वेचे आरपीएफ कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांनी प्रवाशाला ट्रेनमधून पडताना पाहिले. त्यांनी ताबडतोब धाव घेत प्रवाशाला धरले आणि त्याला मागे खेचले, ज्यामुळे जीवघेण्या अपघातापासून वाचला. सदर प्रवाशाला तातडीच्या कामामुळे कुठल्याही प्रकारी गाडीत बसायचे होते. त्यामुळे त्याने धावत्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केल्याने संतुलन जाऊन ही घटना घडली. सदर प्रवाशाला समुपदेशन करण्यात आले आणि त्याचा प्रवास सुरक्षितपणे सुरू ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शन देण्यात आले. या एकूण घटनेत आरपीएफ कॉन्स्टेबल राम नारायण सिंह दाखवलेली समयसूचकता आणि कर्तवनिष्ठा यासाठी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.

----------

हिंदुस्थान समाचार / मेघा माने


 rajesh pande