नाशिकच्या खनिज अधिकारी पदी चव्हाण यांची नियुक्ती, राज्यातील दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या
नाशिक, 31 मे (हिं.स.)। - राज्यातील गौण खणिज अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले असून नाशिकचे नवे गौण खनिज अधिकारी म्हणून दि.ल. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या गौण खनिज विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी रात्री
नाशिकच्या खनिज अधिकारी पदी चव्हाण यांची नियुक्ती, राज्यातील दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या


नाशिक, 31 मे (हिं.स.)।

- राज्यातील गौण खणिज अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले असून नाशिकचे नवे गौण खनिज अधिकारी म्हणून दि.ल. चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राज्य शासनाच्या गौण खनिज विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आले असून दहा अधिकाऱ्यांचा समावेश आहे सु.श्री.नैताम यांची चंद्रपूर वरून नागपूर येथील प्रदेश कार्यालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे तर श्रीमती प्र.रा. चापले यांची अकोल्यावरून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आलेली आहे दी. ना. धांडे यांची प्रादेशिक कार्यालय नागपूर येथून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आलेली आहे तर श्रीमती नि.म.जाधव यांची प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर येथून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बदली करण्यात आली आहे सोलापूर येथील श्रीमती वर्मा यांची बदली अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करण्यात आलेली आहे नंदुरबार येथील दि.ल. चव्हाण यांची बदली नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेली आहे तर विसर घोडके यांची छत्रपती संभाजी नगर येथून कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे श्रीमती रो.शी .चव्हाण यांची नासिक जिल्हाधिकारी कार्यालयातून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बदली करण्यात आलेली आहे. हे बदल्यांचे आदेश गौण खनिज विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत ठोके यांच्या आदेशाने निघालेले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI


 rajesh pande