रत्नागिरी : गुड समेरिटन पुरस्कार योजना कार्यान्वित
रत्नागिरी, 8 मे, (हिं. स.) : मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्तांचे जीव वाचविणाऱ्यांसाठी गुड समेरिटन पुरस्कार योजना कार्यान्वित असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी कळविले आहे. केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग
रत्नागिरी : गुड समेरिटन पुरस्कार योजना कार्यान्वित


रत्नागिरी, 8 मे, (हिं. स.) : मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्तांचे जीव वाचविणाऱ्यांसाठी गुड समेरिटन पुरस्कार योजना कार्यान्वित असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी कळविले आहे.

केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहनांच्या जीवघेण्या अपघातात अपघातग्रस्त झालेल्या व्यक्तीस तात्काळ मदत करणाऱ्या आणि अपघाताच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना हॉस्पिटल्स, ट्रॉमा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या गुड समेरिटनला अपघातात बळी पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविल्याबद्दल पुरस्कार देण्याची योजना जाहीर केली आहे. रस्त्यावरील मोटार अपघातातील अपघातग्रस्तांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याकरिता सामान्य जनतेस प्रवृत्त करणे व निष्पाप जीव वाचविण्यासाठी इतरांना प्रेरणा देणे, प्रेरित करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande