रत्नागिरी, 8 मे, (हिं. स.) : महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे विलीनीकरण करण्यात आले असून बँकेचे रत्नागिरी कार्यालय सुरू झाले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकांच्या विलीनीकरणानंतर 'महाराष्ट्र ग्रामीण बँक नावाची एकमेव प्रादेशिक ग्रामीण बँक' १ मे पासून अस्तित्वात आली आहे. या विलीनीकरणानंतर आता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवा क्षेत्राचा विस्तार करण्यात आला आहे.
रत्नागिरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाचा पत्ता असा - महाराष्ट्र ग्रामीण बँक, प्रादेशिक कार्यालय, भैरवनाथ कृपा, 792 पी, अपराध रुग्णालयासमोर, मजगाव रोड, मारुती मंदिर, रत्नागिरी असा आहे, असे बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक पद्मसिंह पाटील यांनी कळविले आहे.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी