अमेरिका, चीनसह बड्या देशांकडून त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला
वॉशिंगटन, 8 मे (हिं.स.)।भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशात आणखी तणाव वाढला आहे. भारताने सीमाभागातील सर्व राज्यात सुरक्षा वाढवली आहे. त्याशिवाय दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. पाकिस्ताननेही या हल्ल्यानंतर एलओसीवर सातत्याने गोळीबा
India - Pakistan


वॉशिंगटन, 8 मे (हिं.स.)।भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दोन्ही देशात आणखी तणाव वाढला आहे. भारताने सीमाभागातील सर्व राज्यात सुरक्षा वाढवली आहे. त्याशिवाय दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचा सपाटा सुरू आहे. पाकिस्ताननेही या हल्ल्यानंतर एलओसीवर सातत्याने गोळीबार सुरू केला आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धाचे सावट आहे. यातच बड्या देशांनी त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तानात प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.

अमेरिका, ब्रिटन यांनी मार्गदर्शक सूचना जारी करत भारत आणि पाकिस्तानातील भागात प्रवास करू नका असा सल्ला दिला आहे. लष्करी हालचाली आणि हवाई क्षेत्र बंदी या शीर्षकाखाली पाकिस्तानातील अमेरिकन दूतावासाने नागरिकांना सूचना दिल्या आहेत. दहशतवाद आणि सशस्त्र दलाच्या संघर्षाच्या शक्यतेमुळे भारत पाकिस्तान सीमेत आणि नियंत्रण रेषेच्या परिसरात अमेरिकन नागरिकांना प्रवास करू नका असं सांगण्यात आले आहे.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानातील हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक उड्डाणे रद्द करण्यात आलीत. त्यामुळे अमेरिकेच्या दूतावासाने अमेरिकन नागरिकांना सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असा सल्ला दिला आहे. अमेरिकेसह ब्रिटननेही त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तान सीमेपासून १० किमी आणि नियंत्रण रेषेच्या १६ किमी अंतरावर प्रवास करू नका असं सांगितले आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. ब्रिटीश नागरिकांनी योग्य त्या सूचनांचे पालन करावे असं सांगण्यात आले आहे. चीननेही त्यांच्या नागरिकांना भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात या दोन्ही देशात प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande