भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकिस्तानने व्हिक्टिम कार्ड खेळू नये - निकी हॅले
वॉशिंग्टन, 9 मे (हिं.स.)। ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी(दि.८) रात्रीच्या सुमारास जम्मू शहर आणि अन्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताने पाकिस्तानचा हा डाव उधळून लावला. या सर्व घडामोडी घडत असताना देशाचे परराष्ट्रमंत
Niki hale


वॉशिंग्टन, 9 मे (हिं.स.)। ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी(दि.८) रात्रीच्या सुमारास जम्मू शहर आणि अन्य ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र भारताने पाकिस्तानचा हा डाव उधळून लावला. या सर्व घडामोडी घडत असताना देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अनेक देशांशी संवाद साधत भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली. यानंतर अमेरिकेच्या नेत्यांनी भारताच्या कारवाईला समर्थन दिले असून, पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे.

अमेरिका हा भारत-पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही. कारण आमचे ते काम नाही, त्याच्याशी संबंध नाही. आम्ही जर काही करू शकत असू, तर ते असे की, या दोन्ही देशांना तणाव थोडा कमी करण्यास प्रोत्साहित करू शकतो. परंतु, आम्ही मधे पडणार नाही. मुळात जे आमचे काम नाही, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेच्या क्षमतेशी त्याचा काहीही संबंध नाही. अमेरिका भारतीयांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. आम्ही पाकिस्तान्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगू शकत नाही. यामुळे आम्ही राजनैतिक मार्गांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांनी म्हटले आहे. यानंतर आता अमेरिकेच्या नेत्या निकी हॅले यांनी एक्सवर एक पोस्ट करत भारताची बाजू घेत पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डझनभर भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारताला प्रत्युत्तर देण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार होता. पाकिस्तानने आता कांगावा करू नये. पाकिस्तानला आता व्हिक्टिम कार्ड खेळता येणार नाही. दहशतवादी कारवाया करणाऱ्या देशाला पाठिंबा देऊ शकत नाही, असे अमेरिकेच्या नेत्या निकी हॅले यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जवळपास १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. त्यात कुख्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख कमांडर अब्दुल रौफ असगरचा समावेश होता. रौफच्या मृत्यूची बातमी मिळताच भारताच्या यशाचे सगळ्यांनी कौतुक केले. भारताच्या या कारवाईमुळे इस्त्रायल आणि अमेरिकाही खुश झाला आहे. अमेरिका-इस्त्रायली लोकांनी Thank You India असे म्हणत भारताचे कौतुक केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande