अमरावती, 10 जून (हिं.स.) साधारणतः तीन महिन्यांअगोदर ग्रामपंचायतची एनओसी नसतानाही रहिवाशी ले-आउटच्या अॅम्युनिटी केंद्रावर सुरू करण्यात आलेल्या नियमबाह्य ढाब्यावर दारूविक्री होत असल्याबाबतची तक्रार दाखल झाली होती. त्या अनुषंगाने ८ जूनच्या रात्री ८ वाजताच्या दरम्यान पथ्रोट पोलिसांनी धाड टाकत इंग्लिश दारू पकडली. सदर ढाब्यावर दारूविक्रीचा व्यवसाय करणार नाही, असे लेखी हमीपत्र लिहून दिल्यानंतरही दारूविक्रीचा प्रकार सुरूच होता, हे विशेष.
पोलिसांची पथ्रोट टाउनमध्ये पेट्रोलिंग ड्युटी सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार सदरचा नियमबाह्य ढाबा या ठिकाणी एक इसम अवैधरीत्या विनापरवाना इंग्लिश दारू विक्री करिता जवळ बाळगून आहे , अशी माहिती मिळाली त्यानुसार घटनास्थळ पोलिसांनी जप्ती पंचनाम्यातील पंचासमक्ष नियमबाह्य भाऊचा ढाबा येथील काउंटरची पंचासमक्ष पाहणी केली असता एका नायलॉन पिशवीमध्ये १८० एमएलच्या १० एमडी व्हिस्की इंग्लिश दारू जिची अंदाजे किंमत २ हजार रुपये आहे.
असा माल मिळून आला. त्यावरून दारूविक्री करणारा स्वप्निल बाळकृष्ण मोकलकर (३२) रा. शहापूर अंजनगाव सुर्जी या संशयित आरोपीवर कलम ६५ म. दा. का. प्रमाणे कारवाई करण्यात आली.
अशाच प्रकारची कारवाई शेतकरी ढाब्यावरसुद्धा करण्यात आली. त्या ठिकाणावरूनही १८० एमएल च्या ६ नग रॉयल स्टॅग इंग्लिश दारू जिची अंदाजे किंमत १२०० रुपये आहे. सदरचा माल जप्त करून निखिल प्रकाशराव काळे (३३) - रा. गोरलेपुरा पथ्रोट याच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
यासह चंदू भाऊराव दांडगे रा. इंदिरानगर पथ्रोट हा त्याचे राहते घरासमोर अवैधरीत्या देशीदारू विक्री करिता जवळ बाळगून आहे. अशा माहितीवरून धाड टाकली असता ९० एमएलच्या १२ नग देशीदारू पावट्या अंदाजे किंमत ६०० रुपयांचा माल मिळून आला.सदर नियमानुसार प्रकरणात कारवाई करण्यात आली. सदरची - कारवाई पोलिस हेस्ट कॉन्स्टेबल प्रवीण आगरकर, - सैनिक साहेबराव गभने, भूषण उमक, अंकुश राऊत, महिला सैनिक गायत्री वंजारी व अश्विनी मस्करे यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी