मुंबई, 12 जून (हिं.स.) प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नावीन्य पणा आण्यासाठी लेखक, कलाकार आणि पूर्ण टीमची सदैव मेहनत सुरूच असते. हल्लीच ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत सावली सारंगच्या लग्नाचा सीन पार पडला. आता मालिकेतल लग्न म्हंटल्यावर त्यात काहीतरी ट्विस्ट असणारच. सावलीच्या एन्ट्रीवर तुमचा प्रतिसाद पाहून कलाकाराची मेहनत सफल होताना दिसते.
सावलीची भूमिका साकारत असेलेली प्राप्ती रेडकरने घोडेस्वारी सीनचा अनुभव सांगितला जेव्हा मला कळलेलं कि सेटवर घोडा येणार आहे तेव्हा पासून मी उत्साही होते आणि त्यात मला नऊवारी साडी नेसून साज- शृंगार करून घोडेस्वारीचा सीनपूर्ण करायचा होता. हे ऐकल्यावर मी थोडी नर्व्हस होते कारण पहिल्यांदाच आयुष्यात मी हे करणार होते. माझ्या आई- बाबांनी माझ्या आत्मविश्वास वाढवला. मला सेटवरच याची ट्रेनिंग दिली गेली. मला दिग्दर्शक सर म्हणले कि तुला बॉडी डब्बलची गरज आहे का, तेव्हा मी त्यांना सांगितले हे मी स्वतः करणार. नऊवारी साडी, नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर आणि सावळा मेक-अप उन्हात सांभाळून घोडेस्वारी करण आव्हानात्मक होते पण छानपणे आमचे सीन्स पार पडले. . जेव्हा सेटवर घोड्याची एन्ट्री झाली तेव्हा मला कळले कि तो घोडा नाही तर घोडी आहे आणि तीच नाव रज्जो आहे. मी सीन्स मध्ये तिच्याशी गप्पा मारत होते. म्हणजे मी बोलत होते आणि ती ऐकत होती. मी रज्जोच्या प्रेमात पडली, सीन मध्ये जेव्हा ऊन लागत होते तेव्हा तिला सावली मिळत आहे याची मी काळजी घेत होती. कमी वेळात घट्ट नातं निर्माण झालं होत आमच्यात. कलाकार म्हणून अनेक वेगळ्या गोष्टी मला करण्याचा अनुभव मिळतो.
तेव्हा बघायला विसरू नका सावली- सारंगचा नव्याने सुरु झालेला संसार 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत दररोज संध्या. ७: ०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
-------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर