अपघात एरंडोलचा दुचाकीस्वार ठार
जळगाव , 12 जून (हिं.स.) भरधाव कार चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात एरंडोलचा दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना मेहुणबारे ते बहाळ रस्त्यावर जामदा गावाच्यापुढे वळणावर घडली. अपघातानंतर कार चालक पळून गेला. संजय क
अपघात एरंडोलचा दुचाकीस्वार ठार


जळगाव , 12 जून (हिं.स.) भरधाव कार चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात एरंडोलचा दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना मेहुणबारे ते बहाळ रस्त्यावर जामदा गावाच्यापुढे वळणावर घडली. अपघातानंतर कार चालक पळून गेला. संजय काशिनाथ पाटील (५७) रा. ओमनगर, एरंडोल असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश हिंमत पाटील रा. लक्ष्मीनगर, एरंडोल हे त्यांचे साडू संजय काशिनाथ पाटील (५७) रा. ओमनगर, एरंडोल यांच्यासमवेत एमएच १९ ईएल ८००० या दुचाकीने घराकडे जात असताना मेहुणबारे ते बहाळ रस्त्यावर जामदा गावाच्या पुढे वळणावर बहाळकडून मेहुणबारेकडे येत असलेल्या एमएच ५४, ००६७ या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत संजय पाटील हे चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. त्यात संजय काशिनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande