स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मारहाण करून लुटमार
सोलापूर, 13 जून, (हिं.स.)। स्वस्त दरात अर्धा किलो सोने खरेदी देण्याचे आमीष दाखवून एका तरूणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडून दीड लाखाची रोकड लुटल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील पांडे गावात घडला. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांतील चौघाजणांव
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मारहाण करून लुटमार


सोलापूर, 13 जून, (हिं.स.)। स्वस्त दरात अर्धा किलो सोने खरेदी देण्याचे आमीष दाखवून एका तरूणाला बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडून दीड लाखाची रोकड लुटल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील पांडे गावात घडला. याप्रकरणी एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांतील चौघाजणांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.

ज्ञानेश्वर रामराव टेकाळे (वय ३५, रा. चिखलठाणा, जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी एका यात्रेत त्यांच्याशी एका महिलेची ओळख झाली होती. त्या महिलेने आपल्याकडे आर्थिक अडचणीमुळे अर्धा किलो सोने असून ते स्वस्त दराने विकायचे आहे, असे सांगितले. हे सोने खरेदी करण्याची गळ घातली. त्यानुसार त्या महिलेने विकायचे म्हणून आणलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी काही दागिने दाखविले. ते शुद्ध असल्याची खात्री पटल्याने स्वस्त दरात सोने खरेदी करण्याच्या आमिषाला ते बळी पडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande