राधा यादवची इंग्लंड दौऱ्यासाठीच्या महिला संघात वर्णी
मुंबई, 12 जून (हिं.स.) : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात दुखापतग्रस्त शुची उपाध्यायच्या जागी राधा यादवची निवडकरण्यात आली आहे. २८ जूनपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खे
राधा यादव


मुंबई, 12 जून (हिं.स.) : इंग्लंड

दौऱ्यासाठी भारतीय संघात दुखापतग्रस्त शुची उपाध्यायच्या जागी राधा यादवची निवडकरण्यात आली आहे. २८ जूनपासून सुरू

होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-२०

आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे.

बीसीसीआयने

एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्यातश्रीलंकेतील तिरंगी मालिकेदरम्यान एकदिवसीय

क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी २० वर्षीय डावखुऱी फिरकी गोलंदाज शुची उपाध्यायच्या

डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळेच महिला निवड समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी

टीम इंडियाच्या संघात तिच्या जागी राधा यादवची निवड केली आहे.

राधा

यादवने ७ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामने आतापर्यंत भारताकडून खेळले आहेत. दरम्यान, भारताकडून

शेवटचा एकदिवसीय सामना तिने डिसेंबर २०२४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. या

सामन्यात चार फलंदाजांना तिने बाद केले होते. यानंतर तिला संघात आपले स्थान कायम

राखता आले नव्हते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra


 rajesh pande