सोलापूर : पोलिसाच्या मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन
सोलापूर, 12 जून (हिं.स.) : तुळजापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. माझ्यावर प्रेम कर, लग्न कर नाहीतर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन अशी धमकी तरुणांकडून दिली जात होती. बदनामीच्या भीतीने शेवटी मुली
सोलापूर : पोलिसाच्या मुलीने गळफास घेऊन संपवले जीवन


सोलापूर, 12 जून (हिं.स.) : तुळजापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीनं छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. माझ्यावर प्रेम कर, लग्न कर नाहीतर तुझी सोशल मीडियावर बदनामी करेन अशी धमकी तरुणांकडून दिली जात होती. बदनामीच्या भीतीने शेवटी मुलीनं आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुळजापूर शहरात पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत राहणाऱ्या मुलीचं नाव सारिका शिकारे असं आहे. १५ वर्षीय सारिकाची आई पोलीस कॉन्स्टेबल आहे. सारिकाने तरुणांकडून देण्यात आलेल्या धमक्यांनंतर बदनामीच्या भीतीनं गळफास घेत आत्महत्या केली.ओंकार कांबळे याच्यावर याआधी बंदूक घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं गुन्हा दाखल झाला होता. आता ओंकार कांबळेसह दोघांवर गुन्हा दाखल झाला असून कठोर कारवाई केली जाईल असं साेलापूर पोलिसांनी सांगितलं आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande