सोलापूर, 12 जून (हिं.स.)।
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपआयुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क भाग्यश्री जाधव, राज्य उत्पादन शुल्क एस.आर.पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.1 या कार्यालयाने मोहोळ तालुक्यातील मोजे सिकंदर टाकळी व कुरूल परिसरात अवैध गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेल्या विदेशी मद्याचे वाहन क्र. एम.एच 07 ए.एस-3534 या वाहनामध्ये विदेशी मद्याचे 60 बॉक्सेस व एम.एच 07 ए जी 8898 या वाहनामध्ये विदेशी मद्याचे एकुण 80 बॉक्सेस व दोन चारचाकी वाहनास एकुण सदर कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास निरिक्षक आर.एम.चवरे व दुय्यम निरीक्षक एस.डी.कांबळे हे करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर, अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण 570 गुन्हे नोंद करण्यात आले असून 571 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत 2 लाख 14 हजार 925 ली. रसायन, 9 हजार 775 लि. हातभट्टी दारू, 1053.19 ब लि.देशी मद्य, 584.32 ब.ली. विदेशी मद्य, 102.32 ब.ली.बिअर, 3278 ली.ताडी तसेच 53 वाहनास एकुण रुपये 1 कोटी 68 लाख 99 हजार 550 रुपयाचा प्रोव्हि.गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गतवर्षीच्या सन 2023-24 च्या तुलनेत सन 2024-25 या वर्षात एकुण गुन्ह्यात 25 टक्के व एकुण मुद्देमालात 35 टक्के वाढ झाली आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड