तेहरान, 13 जून (हिं.स.)। इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरानवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला आहे. इस्रायलने इरानच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करून हा हवाई हल्ला केला आहे. याशिवाय, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादनेही इराणमध्ये अनेक ऑपरेशन सुरु केले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतान्याहू म्हणाले, की काही वेळापूर्वी इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लाइन सुरू केले आहे. हे इराणच्या परमाणु धोक्याला नष्ट करण्यासाठी आहे. हे ऑपरेशन जेवढे दिवस आवश्यक असेल तेवढे चालेल.
इराणची राजधानी तेहरानमधील अनेक राहत्या इमारतींमध्ये स्फोटांनंतर आग लागली आहे. इराणमधील नातांज आणि फोर्दो अणुकेंद्रांमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. तसेच तेहरानमधील इमाम खुमैनी विमानतळावरही स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल मीडिया आणि इराणच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये शहरातील वेगवेगळ्या भागातील अनेक उंच इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसत आहेत. या हल्ल्यात एकूण किती लोक मारले गेले, कोण कोण मारले गेले किंवा इराणचे किती नुकसान झाले, याची अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी आलेली नाही.
इस्रायलने तेहरानमधील रिव्होल्यूशनरी गार्डचे मुख्यालयही उद्ध्वस्त केले आहे. वृत्तानुसार, इस्रायलने इराणचे लष्करप्रमुख, रिव्होल्यूशनरी गार्डचे प्रमुख, अनेक वरिष्ठ परमाणु शास्त्रज्ञ आणि इराण सत्तेशी संबंधित अनेक वरिष्ठ लोकांना या हल्ल्यात मारले आहे. इस्रायली अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले आहे की, असे दिसते की इराणचे अनेक वरिष्ठ जनरल इस्रायली हल्ल्यात मारले गेले आहेत. इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर आणि परमाणु ठिकाणांवरही हल्ले केले आहेत. हे ईरानवर इस्रायलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अमेरिकेने म्हटले आहे की या हल्ल्यात अमेरिकेचा कोणताही सहभाग नसून, आम्ही इस्राइलला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलेलं नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.इस्रालइकडून इराणमध्ये हल्ले करण्यात आल्यानंतर इराणकडून होणाऱ्या प्रत्युत्तरदाखल कारवाईच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून इस्राइलमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. इराणकडून कोणत्याही क्षणी क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होऊ शकतो, असे इस्राइलचे संरक्षणमंत्री इस्राइल काट्स यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode