अहिल्यानगरच्या अनुराधा मिश्रांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
अहिल्यानगर, 14 जून (हिं.स.)। अहिल्यानगर येथील अनुराधा मिश्रा यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंग ॲण्ड डेडलिफ्ट अनइ क्युपेटेड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविले. नुकतीच ही राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दिल्ली रोहिणी येथे पार पडली. यामध्ये 30 पेक्षा
नगरच्या अनुराधा मिश्रा यांची स्पेन येथे होणाऱ्या आंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


अहिल्यानगर, 14 जून (हिं.स.)। अहिल्यानगर येथील अनुराधा मिश्रा यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंग ॲण्ड डेडलिफ्ट अनइ क्युपेटेड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविले. नुकतीच ही राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा दिल्ली रोहिणी येथे पार पडली. यामध्ये 30 पेक्षा अधिक महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेत मिश्रा यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांची स्पेन येथे होणाऱ्या आंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या आंतर राष्ट्रीय स्पर्धेत मिश्रा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

दिल्ली रोहिणी येथील राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिश्रा यांनी 63 किलो वजनगटात त्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करुन सुवर्णपदकांची कमाई केली.मिश्रा यांना या स्पर्धे साठी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते तुषार दारकर, सचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे, राष्ट्रीय पंच निशा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्राईकर मध्ये प्रशिक्षक स्वप्निल मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande