अकोला - प्रकृती – ग्रामीण जीवनाची अनुभूती शिबिर संपन्न
अकोला, 14 जून, (हिं.स.)। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अकोला जिल्हाच्या वतीने विकासार्थ विद्यार्थी या गतीविधी अंतर्गत प्रकृती – ग्रामीण जीवनाची अनुभूती हे तीन दिवसीय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा.
P


अकोला, 14 जून, (हिं.स.)।

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अकोला जिल्हाच्या वतीने विकासार्थ विद्यार्थी या गतीविधी अंतर्गत प्रकृती – ग्रामीण जीवनाची अनुभूती हे तीन दिवसीय शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

शिबिराचे उद्घाटन विदर्भ प्रांत उपाध्यक्ष प्रा. उमेश कुडमेथे, प्रांत सहसंघटन मंत्री श्री. मनोज साबळे, जिल्हा संयोजक सुहास मोरे, शिबिर प्रमुख चंदकांत बोबडे तसेच सर्व कार्यकर्ते व शिबिरार्थी यांच्या उपस्थितीत पार पडले.

शिबिरादरम्यान शिबिरार्थींनी निसर्गाच्या सान्निध्यात विविध उपक्रमांतून ग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला. यात पर्वतारोहण, खेळ सत्र, पत्रावळ्या निर्मिती, वनभोजन इत्यादी उपक्रमांचा समावेश होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्ये, पर्यावरण संवर्धन, एकात्मता व सहकार्याचे मूल्य आत्मसात केले.

शिबिराचा दुसरा दिवस प्रेरणादायी ठरला. अभाविप परिचय या सत्रात श्री. मनोज साबळे यांनी अभाविपच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. त्यानंतर श्री संत गजानन महाराज विहिरीचे दर्शन व पोपटखेड धरणाचा शैक्षणिक दौरा करण्यात आला. ग्राम सर्वेक्षण कार्यक्रमात शिबिरार्थींनी स्थानिक गावातील जीवन, गरजा व समस्या जाणून घेतल्या.

तिसऱ्या दिवशी, शिबिरार्थींनी नैसर्गिक साधनांपासून भोजनाकरिता पत्रावळ्या तयार केल्या व वनभोजनाचा आनंद घेतला. त्यानंतर अनुभवकथन सत्रात, शिबिरातील अनुभव विद्यार्थ्यांनी मांडले. या सत्राचे मार्गदर्शन श्री. मनोजजी साबळे यांनी केले.

समारोप कार्यक्रमास जिल्हा संघटन मंत्री श्री. नयन सोलंकी उपस्थित होते व त्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन जिल्हा संयोजक सुहास मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या मंचावर अकोट नगर मंत्री प्रणव पाटील यांचीही उपस्थिती लाभली.

या शिबिरात अकोला जिल्ह्यातील 6 शाखांमधून 9 ठिकाणांवरील 41 विद्यार्थी, 21 विद्यार्थीनी आणि 2 प्राध्यापक असे एकूण 64 शिबिरार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande