अकोला, 14 जून (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली भूमिगत गटार योजना नुकतीच मंजूर झाली असून सदर योजनेच्या कामाला शनिवारी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी मनपा अधिकाऱ्यांसह, कंपनीचे अधिकारी, स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरासाठी महत्त्वाकांक्षी अशी असलेली भूमिगत गटार योजनेला तांत्रिक मान्यता नुकतीच मिळाली असून सदर योजनेच्या कामाला शनिवारी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला. स्थानिक भगतवाडी परिसरातून सदर कामाला प्रारंभ होत असल्याने या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी आमदार साजिद खान पठाण यांनी स्थानिक नागरिकांना भूमिगत गटार योजनेचे महत्त्व समजावून सांगत सदर योजनेच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर याप्रसंगी खोदल्या गेलेले रस्ते हे लवकरात लवकर उत्तम दर्जाचे तयार होतील अशी ग्वाही दिली.
या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी मनपाचे उप अभियंता पी. एम. देशमुख, शैलेश चोपडे, बांधकाम विभागाचे माणिकराव, पीएमसी चे प्रोजेक्ट इन्चार्ज प्रवीण मंडाले, आशिष माकोडे, सोमेश मानकर, एच अँड बी कंपनीचे परेश भाई पटेल यांच्यासह माजी नगरसेवक मोहम्मद इरफान, नफीस जिलानी, महाराष्ट्र सचिव ओबीसी विभाग, माजी नगरसेवक मोहमद फ़ज़लू पहेलवायून, कामकाजमंत्रीमाजी नगर सेवक मोहम्मद मुस्तफा पलवान, माजी नगरसेवक अफसर अहमद, कलीम खान, अकुंश तायडे, शेख कमरूउद्दीन, इमरान भाई, ज़ाकिर भाई बैंक वाले, अनवर भाई, इमदाद ऑटो यूनान,करीम भाई पलंबर, हैदर भाई यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे