मुंबई - गोवंडीत डंपरने तिघांना चिरडले; परिसरात तणावाची परिस्थिती
मुंबई, 14 जून (हिं.स.)। मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर भागातील सिग्नलवर डंपर चालकाने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डं
मुंबई - गोवंडीत डंपरने तिघांना चिरडले;  परिसरात तणावाची परिस्थिती


मुंबई, 14 जून (हिं.स.)। मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर भागातील सिग्नलवर डंपर चालकाने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना दुपारच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात तिन्ही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर स्थानिक जमावाने संताप व्यक्त करत डंपरचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपघातानंतर या परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच काही काळासाठी तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती. अपघातानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले. रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. या भागात दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी रस्ता अडवल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. या घटनेनंतर संतप्त जमावाने या मार्गावर ठिय्या दिला.

हा अपघात का झाला? याचा शोध घेतला जात आहे. अपघातस्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिक टीम येथे हजर असून तपास केला जात आहे. या प्रकरणातील डंपर चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande