राजकोट, 16 जून (हिं.स.) : गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर आज, शासकीय इतमामात राजकोट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल अंत्यसंस्काराला उपस्थित होते. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात रुपाणी यांचे निधन झाले होते. दरम्यान रविवारी (१५ जून) विजय रुपाणी यांचे डीएनए मॅच झाल्यानंतर त्यांचे पार्थीव कुटुंबियांना सोपवण्यात आले होते.
माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या पार्थिवाला राजकोटमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यापूर्वी, राजकोट शहर पोलिसांनी विविध ठिकाणी मार्ग वळवण्याची आणि पार्किंगची व्यवस्था केली होती. सुरक्षा आणि व्यवस्थापनासाठी 1500 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विजय रुपाणी यांच्या निधनाबद्दल राज्य शोक म्हणून, सोमवारी राज्यातील महत्त्वाच्या इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. गुजरात विधानसभा, स्वर्णिम कॉम्प्लेक्स, गांधीनगर येथे तिरंगा अर्ध्यावर फडकवण्यात आला.
माजी मुख्यमंत्री विजय 12 जून रोजी अपघात झालेल्या एअर इंडियाच्या त्याच विमानात होते. त्यात क्रू-मेंबर्ससह 241 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. रविवारी सकाळी 11 वाजता विजय रुपानी यांचा डीएनए नमुना जुळवण्यात आला. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी विजय रुपानी यांच्या डीएनए जुळवण्याची माहिती त्यांच्या कुटुंबाला दिली होती.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी