ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलची वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
कॅनबेरा, 2 जून (हिं.स.)।ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने सोमवारी(दि.२) अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.३६ वर्षीय मॅक्सवेलने त्याच्या १२ वर्षाच्या एकदिवसीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी केल्या.ऑस्ट्रेलियाला दोनदा एकदि
Glenn maxwell


कॅनबेरा, 2 जून (हिं.स.)।ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने सोमवारी(दि.२) अचानक एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.३६ वर्षीय मॅक्सवेलने त्याच्या १२ वर्षाच्या एकदिवसीय कारकिर्दीत अनेक संस्मरणीय खेळी केल्या.ऑस्ट्रेलियाला दोनदा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात मॅक्सवेलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मॅक्सवेलने पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचकावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

निवृत्तीची घोषणा करताना मॅक्सवेल म्हणाला, 'परिस्थितीनुसार शरीर साथ देत आहे. मी ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांच्याशी २०२७ च्या विश्वचषकाबद्दल चर्चा केली. मी त्यांना सांगितले की, मला वाटत नाही की, मी त्यात यशस्वी होऊ शकेन. आता माझ्या जागी येणाऱ्या नवीन खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करावे.'

मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियासाठी १४९ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ३३.८१ च्या सरासरीने ३९९० धावा केल्या. या दरम्यान, त्याने ४ शतके आणि २३ अर्धशतके केली. त्याची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध २०१ धावांची नाबाद खेळी होती. ही एकदिवसीय इतिहासातील सर्वोत्तम खेळींपैकी एक मानली जाते. मॅक्सवेलने गोलंदाजीतही योगदान दिले असून, आपल्या कारकिर्दीत ७२ बळी घेतले आहेत.

२०२३ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध ७ बाद ९१ होता, तेव्हा मॅक्सवेलने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दुखापतग्रस्त असूनही त्याने संघाला मोठा विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यात मॅक्सवेलने १२८ चेंडूत नाबाद २०१ धावा केल्या होत्या. त्यात २१ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. या दरम्यान त्याने कर्णधार पॅट कमिन्स (१२) सोबत आठव्या विकेटसाठी तब्बल २०२* धावांची भागीदारी करत २९२ धावांचे लक्ष्य गाठले होते. पुढे ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून विश्वचषक आपल्या नावावर केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande