वॉशिंगटन , 20 जून (हिं.स.)।इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षात अमेरिला सहभाग घेणार होती. परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत आता बदल झाला आहे. इराणवर हल्ला करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याच्या अंतिम आदेशाचा निर्णय दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी कारवाई करावी की नाही? हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात ठरवणार आहेत, असे व्हाईट हाऊसने सांगितले आहे.
व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा संदेश शेअर केला. त्यांनी म्हटले की, नजीकच्या भविष्यात इराणशी वाटाघाटी होण्याची किंवा न होण्याची शक्यता आहे. त्या आधारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यात निर्णय घेतील. ट्रम्प नेहमीच राजनैतिक तोडग्याच्या बाजूने असतात. ते शांततेचे पुरस्कर्ते आहेत. जर राजनैतिक भूमिकेची शक्यता असेल तर ते निश्चितच स्वीकारतील.
दरम्यान, यापूर्वी माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, मी हल्ला करेन किंवा करणार नाही. त्यासाठी पुढचा आठवडा खूप महत्त्वाचा असणार आहे. कदाचित त्यापेक्षा कमी वेळेत हा निर्णय घेतला जाईल. डोनाल्ड ट्रम्प इराणला वेळ देत आहे. इराणाने अण्वस्त्र निर्मितीची भूमिका सोडली तर अमेरिका हल्ला करणार नाही. परंतु इराणकडून अमेरिकेच्या अटी मान्य झाल्या नाही तर पुढील दोन आठवड्यात ट्रम्प इराण-इस्त्रायल युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेणार आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणला शरण येण्याचे म्हटले होते. त्याच्या उत्तरात खोमेनेई यांनी अमेरिका या युद्धात उतरल्यास त्यांना त्याची भरपाई मोजावी लागणार आहे. अमेरिका या युद्धात उतरण्याच्या तयारीत असताना रशियानेही अमेरिकेला इशारा दिला आहे. रशियाने म्हटले की, या युद्धात अमेरिका उतरल्यास त्यांच्यासाठी ते सर्वात धोकादायक पाऊल ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode