जळगाव , 3 जून, (हिं.स.) सुरत येथील ३५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये आणून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील विनोद शिवराम कुसळकर (वय ३५) याच्यावर जळगाव शहर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरत येथे नोकरी करणारी पीडित तरुणी आपल्या उपजीविकेसाठी तिथे वास्तव्य करत आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील रहिवासी विनोद कुसळकर याने १८ मे रोजी दुपारी साडेचार ते साडेपाच वाजेदरम्यान तिला जळगाव रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यासंदर्भात पीडितेने तक्रार दाखल केली असून, त्यानुसार विनोद कुसळकर याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर