नाशिक, 3 जून (हिं.स.)। ऑफिसमध्ये येऊन जागा खाली करण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग करून गळ्यातील चेन चोरून नेल्याची घटना जगताप मळा येथे घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला ही तिची मुलगी व इतर लोकांसह ऑफिसमध्ये बसलेली होती. त्यावेळी आरोपी अनिल गायखे व त्यांची मुले यश व ओम् हे ऑफिसमध्ये आले व त्यांनी फिर्यादी महिलेला शिवीगाळ करून तिच्या खांद्याला पकडून तिला केबिनच्या बाहेर ढकलून दिले. तसेच लज्जास्पद वागणूक देऊन तिचा विनयभंग केला. तसेच गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन तोडून घेऊन गेले. जाताना जागा खाली करण्याची धमकी देऊन गेले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वायकर करीत आहेत.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI